www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com
विळे, पाटणूस, भिरा परिसराला पावसाने झोडपले 

24 तासात 243. 40 मि.मि. पावसाची नोंद 


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगाव तालुक्यातील विळे, पाटणूस, भिरा परिसरात गेले तीन धुवांधार पाऊस कोसळत असून येथील जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची भातशेतीची कामे पूर्ण झाल्याने शेतकरी व शेतमजुरांनी घरातच राहणे पसंत केले. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने विळे बाजार पेठतेतही शुकशुकाट जाणवत होता. कुंडलिका नदीने उग्र रूप धारण केल्याने पाटणूस येथे लोखंडी साकव वाहून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.


पाटणूस-पाली मार्गावरील नांदगावचा पूल पूर्ण पाण्याखाली गेल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. अजूनही पाऊस थांबलेला नसून गेल्या 24  तासात भिरा परिसरात 243.40. मि. मि. इतकी पावसाची नोंद झाली असून आता पर्यंत 2300.40 मी. मी. इतका पाऊस आता पर्यंत नोंदविला गेला आहे तरीही गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी  अजूनही पावसाची सरासरी खूपच कमी आहे. जर पाऊस आणखी दोन दिवस असाच पडत राहिला तर तो आपली उणीव भरून काढू शकतो असे येथील जाणकारांचे म्हणणे आहे.

Popular posts from this blog