मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड येथे मोठा अपघात, दोनजण जागीच ठार, एक गंभीर
रायगड (भिवा पवार) : मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड येथे मोठा आपघात झाला असून यामध्ये दोनजण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे हे तातडीने त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले व या तिघांना माणगांव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास पाठवले. दोनजण मृत्यू व एकजण अती गंभीर जखमी झाल्याने त्यास पेण येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तायडे यांनी दिली,
इंदापूर कडून नागोठणेकडे जाणारा टँकर नंबर एम एच 043 वाय 4345 हा मुबंई कडे जात होता तर एम एच 06 बी एक्स 0513 ही मोटर सायकल मुबंई कडून इंदापूर कडे जाणारी कार एम एच 46 ए डी 4285 यावर मोटरसायकल धडकल्याने प्रवास करत असलेले तीन प्रवासी मुबंई कडे जाणाऱ्या टँकरखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे हे करत आहेत.