🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
लोणेरे येथे अवैध दारूविक्री करणाऱ्याला पकडले


लोणेरे (प्रतिनिधी) : माणगाव तालुक्यांतील लोणेरे येथे अवैधपणे दारूची विक्री कित्येक दिवस चालू होती. सध्या जिल्ह्यात चालू असलेल्या लाॅकडाऊनमुळे तळीरामांची चांगलीच अडचण झाली असली तरी लोणेरे परिसरात अवैध रितीने दारू विक्री जोरदार चालू होती. बाईक वर दारू विक्री करताना ग्राहकाला घरपोच दारू चढ्या दरात मिळत होती. त्यामुळे लोणेरे परिसरांत तळीरामांनी धुमाकूळ घातला होता. पाहिजे तिथे पोच दारू मिळाल्याने लोणेरे परिसरांत शाळांच्या चौथऱ्यावर, ग्राऊंडमध्ये, मोकळ्या जागेत, नदीवर दारूच्या बाटल्यांचा खच बघायला मिळत आहे. याबाबतची तक्रार देखील येथील नागरिकांनी केली होती.

याचीच दखल घेत गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लोणेरे येथे गावडे चाळीच्या मागे धाड टाकत माल १४,८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ओंकार शांताराम तवटे (रा. लोणेरेवाडी) यास अटक केली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३३६, ३२३, ५०४, २६९, २७०,१८८ आपत्तीप व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९  चे कलम ६५ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार रविंद्र ढोबळे हे पुढील तपास करीत आहेत.

Popular posts from this blog