www.news24taasmarathi.com पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... www.news24taasmarathi.com
पत्रकार समीर बामुगडे यांना मातृशोक 

कै. जनाबाई बामुगडे यांचे १६ जून रोजी दशक्रीया विधी       


रोहा (प्रतिनिधी) : 
रोहा तालुक्यात निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे पत्रकार समीर बामुगडे यांना ७ जून रोजी अनपेक्षित मातृवियोग झाला. त्यांच्या मातोश्री कै. जनाबाई (वय-७५) यांची प्राणज्योत मावळली.

या घटनेने समस्त बामुगडे कुटूंबासह गावावर शोककळा पसरली. मंगळवार दि. १६ जुन २०२० रोजी दशक्रीया विधी असून गुरूवार दि. १८ जून २०२० रोजी कार्य होणार असल्याची माहिती त्यांचे ज्येष्ठ पुत्र विठ्ठल रामा बामुगडे यांनी दिली.   

कै. जनाबाई रामा बामुगडे आदर्श गृहिणी म्हणून निवी गावासह पंचक्रोशीत सर्वदुर प्रसिद्ध होत्या. शेतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चार पुत्रांचे चांगले संगोपन केले. अंतिम दिवसापर्यंत त्यांनी शेतीचेच काम केले. त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केलेले सर्वांना ठाऊक आहे. या परिसरात त्यांनी आदराचे स्थान मिळविले होते. 

Popular posts from this blog