🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
आरोग्य सेविका हेमलता कदम-कोंढाळकर यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत 


रोहा (समीर बामुगडे) :
दुर्गम भागात कोरोना विरूद्धच्या लढाईत आरोग्य सेविकेचे उत्तमरित्या काम करुन घरी परतलेल्या हेमलता कदम-कोंडाळकर यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

सध्या कोरोना विरूद्थची निकराची लढाई साऱ्या जगभर लढती जात आहे. या लढाईत ढालीसारखे काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, पोलीस यांच्यासह सर्व प्रशासन यंत्रणा यांच्या चांगल्या कार्याबद्दल ठिकठिकाणी समाधान व्यक्त होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञपणाची भावना व्यक्त होताना दिसत आहे. उद्देश हाच की त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या अंगी अधिक बळ यावे.
कोरोना रूग्णांवर उपचार करून घरी परतणारे डॉक्टर, परिचारिका हे त्यातून बरे झाल्यावर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते. परंतू कोणतीही लागण नसलेल्या वेल्हेसारख्या दुर्गम परिसरात आरोग्य सेविकेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या हेमलता कदम-कोंढाळकर यांनीही या दिवसात फार मोठे कार्य करुन दाखविले आहे.
हेमलता कदम-कोंढाळकर असे या आरोग्य सेविकेचे नाव असून त्या रोहे तालुक्यातील पुई गावच्या सुकन्या आहेत. वेल्हे तालुक्यातील पासळी आरोग्य केंद्रात त्या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. तेथे एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. असे असताना अर्धा दिवस ओपीडीमध्ये व उर्वरीत दिवस या दुर्गम भागातील लोकवस्तीत जाऊन कोरोना या गंभीर आजाराबद्दल प्रबोधन करून जनजागृती करीत होत्या. पुणे मुंबई सारख्या शहरात कोरोना विरुद्ध काम करणाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले जात आहे. तर वेल्हेसारख्या आडवळणाच्या व दुर्गम भागात कोरोना विरूद्धच्या लढाईत काम करणाऱ्या त्या सुद्धा कोरोना योद्धाच आहेत.

Popular posts from this blog