🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨
सांडपाण्यावर फुलला सुंदर बगीचा


रोहा (समीर बामुगडे) :
रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी गावचे रहिवासी तथा युवा कार्यकर्ते रविंद्र मरवडे व त्यांचे वडील रामचंद्र मरवडे यांनी आपल्या घरासमोर फुलविलेला बगीचा उन्हाच्या तीव्र झळातही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस तीव्र गतीने वाढत चालला आहे. त्यामुळे या तीव्र झळांनी प्राणीमात्रांचे खूपच हाल होताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेबरोबरच ठिकठिकाणी पाणी टंचाईच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी खूप दूरवरून पाणी आणावे लागत असल्याचे विदारक दृष्य दिसून येत आहे. प्यायला तसेच अन्य गरजा भागवायलाही पाणी नाही. अशा वेळी झाडी झुडपे व बागेतील झाडांना पाणी कुठून आणायचे. हा प्रश्न सर्वांनाच पडला असतानाच युवा कार्यकर्ते रवींद्र मरवडे यांच्या घरासमोरील सांडपाण्याचा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर व सांडपाण्यावर फुलविण्यात आलेला बगीचा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

रविंद्र मरवडे यांचे वडील रामचंद्र मरवडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या काळात आपला फावला अन्यत्र वेळ वाया न घालविता बागबगिचा फुलविण्यावर भर देऊन घरासमोर व घराच्या आजूबाजूच्या परिसरात सुंदर बगीचा फुलविला आहे. या बागेत त्यांनी नारळ, आंबे, चिक्कू, पेरू आदी फळ झाडांबरोबरच विविध शोभेची झाडे, कढिपत्ता व विविध भाजीपाल्याची लागवड आहे. त्यांनी फुलविलेल्या भाजीपाल्याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे. तर सांडपाण्यावर देखील आपण नंदनवन फुलवू शकतो व त्यासाठी मेहनतीची गरज असल्याचा एक आदर्श त्यांनी समाजासमोर दाखवून दिला आहे.

Popular posts from this blog