🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
गडचिरोलीमध्ये वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू 


गडचिरोली : तेंदूपाने तोडण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या एका इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिमन नारायण झिलपे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली.

पहाटे कोंढाळा येथील काही नागरिकांसह अभिमन झिलपे हे गावालगतच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेले होते. सकाळी अकरा वाजतापर्यंत बहुतांश नागरिक गावात परत आले. परंतु अभिमन झिलपे हे आले नाही. त्यामुळे नागरिकांना शंका आली. त्यांनी वडसा वनविभागाला कळविताच उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहायक वनसंरक्षक भास्कर कांबळे, उपविभागीय वनाधिकारी सुनील सोनटक्के, वडसाचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे, आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्राधिकारी (वन्यजीव) रंजन इनवते हे आपल्या सहकाऱ्यांसह जंगलात गेले. तेथे शोध मोहीम राबविली असता दुपारी दीड वाजताच्या सुमारास जंगलात अभिमन झिलपेचा मृतदेह आढळून आला.

जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याने कुणीही त्या परिसरात एकट्याने जाऊ नये, असे वनविभागाचे कर्मचारी गस्त घालून सांगत आहेत. तरीही नागरिक तेंदूपाने तोडण्यासाठी जात असल्याने वाघाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. मागील पंधरवड्यात आरमोरीनजीकच्या जंगलात वाघाने एका इसमास ठार केले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

Popular posts from this blog