🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
सणसवाडी येथे कोरोनाग्रस्त रूग्णाची पत्नीही कोरोना पॉझिटीव्ह.! 


वरचीवाडी विळे, बहिरवाडी, विठ्ठलनगर गावे झाली कॉरन्टाईन, वरचीवाडी विळे बाजारपेठ १४ दिवस बंद  



पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे विले पार्ले मुंबईतून आपल्या कुटुंबियांसोबत आलेले एक ग्रामस्थ कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर विळे परिसर व आजूबाजूच्या गावांमध्ये खळबळ उडाली होती या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच कोरोना बाधित रूग्णाची पत्नी सुध्दा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट नुकताच आल्याने नागरिक आणखी भयभीत झाले आहेत. परंतु सणसवाडीच्या सरपंच सौ. सुनीता नलावडे यांनी ग्रामस्थांना भयभीत न होता शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह पती-पत्नीच्या संपर्कात ८७ नागरिक आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या नागरिकांना शोधून कॉरंटाईन केले जात आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण सणसवाडी गावच कॉरंटाईन करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थांनी घेतला असून इथून पुढे १४ दिवस एकही ग्रामस्थ गावाबाहेर पडणार नाही व गावाबाहेरील व्यक्ती गावात येणार नाही अशी काळजी घेतली जात असून यावर लक्ष ठेवण्यासाठी गावातील १४ तरुणांना पोलीस मित्र म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले असून हे तरुण गावाच्या प्रवेशद्वारावर आळी पाळीने पहारा देणार आहेत. ग्रामस्थांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू बाजार पेठेत जाऊन हे तरुणच आणून देणार आहेत. सणसवाडीत पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची दखल घेत वरचीवाडी विळे ग्रामस्थांनी १४ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणूस पंचक्रोशीतील पुनर्वसीत गाव बहिरीवाडी व विठ्ठल नगर या गावांनी सुद्धा स्वःताला कॉरंटाईन केले असून तेथील तरुणांनी देखील आळी पाळीने जागता पहारा ठेवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अशा प्रकारे ग्रामस्थ काळजी घेत आहेत. सणसवाडीच्या माजी सरपंच देविका पाबेकर यांनी बचत गटाच्या महिलांसोबत घरोघरी जाऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जनजागृती केली.

Popular posts from this blog