🚨 रायगड पोलीस शिपाई भरती : १५ मार्चला अलिबागमध्ये लेखी परीक्षा... 🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य सरचिटणीसपदी 'सतर्क पोलीस टाईम्स'चे संपादक शमशुद्दीन शेख यांची निवड


डोंबिवली (शशिकांत बिर्जे) :
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ (रजि.) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी 'सतर्क पोलीस टाईम्स' या वर्तमानपत्राचे मालक व संपादक श्री. शमशुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. शमशुद्दीन शेख हे गेल्या १० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण  पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवाचा विचार करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. आंबेगावे डी. टी. व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने शमशुद्दीन शेख यांची संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Popular posts from this blog