🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨
बोअरवेल दुरूस्तीमुळे शिवाजीनगरमधील नागरिकांना दिलासा 



लोणेरे (प्रतिनिधी) :
मे महिन्यातील जाणवलेल्या पाण्याच्या कमतरतेची उणीव, लोणेरे ग्रामपंचायतीने दुरूस्त केलेल्या बोअरवेलमुळे दुर झाल्याने शिवाजीनगर रहीवासींना दिलासा मिळाला आहे.

लोणेरे येथील वाॅर्ड क्रमांक चार मधील शिवाजीनगर येथील बोअरवेल नुकतीच बंद पडली होती. यामुळे येथील वसाहतीतील नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवत होती. बोअरवेल बंद पडल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी दुर विहीरीवर व नदीवर  पायपीट करावी लागत होती. परंतु लोणेरे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम सरपंच सौ. शुभांगी डवले, सदस्य समीर टेंबे, अनंत माने, शिवसेनेचे अरूण चाळके  ग्रामसेवक ठाकुर, कर्मचारी आदी सदस्यांनी तात्काळ सदर बोअरवेलची दुरूस्ती मेकॅनिककडून करून घेतली.

तसेच बोअरवेलसाठी उत्कृष्ठ प्रतीचे लागणारे पाईप व बोअरवेलच्या मजबुतीसाठी व सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी सभोवती पक्क्या स्वरूपाचा कट्टा लवकरच बांधून देण्याचे आश्वासन सरपंचानी दिल्याने व बोअरवेल दुरूस्तीमुळे पाण्यासाठी होणारी पायपीट थांबल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog