मुंबईतून आलेल्या आई आणि ३ वर्षाच्या चिमुकलीला घरमालकाने घरात घेणे नाकारले, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांच्या प्रयत्‍नांमुळे झाली राहण्याची व्यवस्था 

माणगांव नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांची कार्यतत्परता


माणगांव (उत्तम तांबे) :
कोरोनामुळे मुंबईमध्ये अडकून पडलेली एक आई आपल्या ३ वर्षाच्या मुलीसह आपल्या पतीकडे माणगांव येथे राहत्या घरी आली असता घर मालकांनी मात्र त्यांना घरात राहण्यास विरोध केला. तिच्या पतीने घर मालकांना पत्नी व मुलींनी डॉक्टरकडून रितसर वैद्यकीय अहवाल घेतला असल्याचे सांगत होम क्वारांटाईन करण्याची विनंती केली, परंतु काही फायदा झाला नाही. नाईलाजास्तव त्यांना आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला घेत घराबाहेर रस्त्यावर थांबण्याची वेळ आली. अशा वेळी त्यांनी आपल्या परिचयाच्या एका व्यक्तीला सांगितले. त्यांनी नगरसेवक, नगरपंचायत कार्यालय, सबंधित कर्मचारी सगळ्यांना फोन केले. परंतु कोणीही फोन उचलले नाहीत. शेवटी मग काहीतरी मार्ग निघावा याकरिता ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांना फोन केला. त्यांनी काही अर्धा तासाभरातच त्यांच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावला.

माणगांव पत्रकार कुवेसकर यांना माहिती मिळताच त्यांनी लगेच नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांना फोन केला आणि माहिती दिली आणि स्वतः जागेवर जात नगराध्यक्षा यांच्या समवेत पाहणी करुन या अडचणीत सापडलेल्या कुटूंबाची चौकशी केली. संपूर्ण परिस्थिती समजून घर मालकाशी सविस्तर चर्चा केली. परंतु ती व्यर्थ ठरली. त्यावेळी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी मग क्षणाचा देखील विलंब न करता माणगांव नगरपंचायती कडून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची सुविधा केलेल्या ग्लोबल इन्स्टिट्यूट येथे सर्व प्रोटोकाॅल प्रमाणे त्यांची राहण्याची सोय केली आहे.

Popular posts from this blog