युवा नेते नगरसेवक सचिन बोंबले मित्रमंडळाकडून विद्यानगर परिसरात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप
माणगांव (प्रतिनिधी) :
देशभरात कोरोनारुपी संकटाचा सामना करताना लॉकडाऊन कालावधीत जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्याची झऴ समाजातील सर्व थरातील नागरिकांना पोहचली. आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या नागगरिकांना म्हणावे तसे परीणाम जाणवले नाहीत मात्र मध्यमवर्गीय समाजाला या वस्तुंचा तुटवडा नक्कीच जाणवला. याचा अंदाज घेऊन समाजातील अनेक दानशुर हात पुढे आले व सामाजिक (स्वयंसेवी संस्था) देखील आपल्या जबाबदारी पार पाडताना दिसुन आल्या. त्यापैकी एक माणगांव नगरपंचायतचे आजातशत्रु नेतृत्व शिवसेनेचे डॅशिंग नगरसेवक व विरोधीपक्षनेते यांनी माणगांव विद्यानगर शिपुरकर कॉम्प्लेक्स परिसरातील मध्यमवर्गीय कुटूंबांचे सर्वेक्षण करुन सुमारे 70 कुटूंबाना अन्नधान्यासमवेत जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप केले.
दि. 7 व 8 रोजी माणगांव नगरपंचायत हद्दीतील शिपुरकर काँम्प्लेक्स परीसर व विद्यानगर परिसर या ठिकाणी सचिन बोंबले मित्रमंडऴाकडुन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
आपण ज्या समाजात जगतो त्या भोवताली परिसरातील समाजातील आपण देणेकरी असतो आणि राष्ट्रीय आपत्ती दरम्यान नागरीकांना मदत करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारीच असते या दायित्व भावनेतुन समाजातील नागरिकांची मध्यमवर्गीय व गरजु कुटूंबे उपेक्षित राहू नयेत म्हणुन हा समाजोपयोगी उपक्रम शिवसेना नेते अॅड राजीव साबळे यांच्या प्रेरणेने युवा नेते नगरसेवक सचिन बोंबले मित्रमंडळाकडून घेण्यात आला व त्याचे मला व मित्रमंडऴातील सदस्यांना व गरजु कुटूंबांना मानसिक समाधान लाभले असल्याचे बोंबले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
या जीवनावश्यक वस्तुंच्या वाटपावेऴी सदस्य राजेंद्र सुर्वे, मंगेश कर्जेकर, अभय भगत, सचिन कवडे, विनायक कोरडे, शेडगे, योगेंद्र साळवी, विशाल घर्वे, भाविन सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे नगरसेवक बोंबले यांनी स्पष्ट केले. नगरसेवक सचिन बोंबले यांनी माणगावातील कुठलेही कुटूंब आणि खरी गरज असणारे कुटूंब मदतीपासून वंचित राहू नये व विशिष्ठ कुटूंबाना आपणांस कोरोना संकट समयी कुठलाच लाभ मिऴाला नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ नये यासाठी नगरसेवक सचिन बोंबले यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे माणगांव तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.