तळा तालुक्यातील मजगांव ग्रा.पं. हद्दीत कायद्याचे उल्लंघन, प्रशासनाचे अध्यादेश ग्रामस्थांनी बसविले धाब्यावर 


सरपंचांची पोलीस दलाकडे मदतीची हाक..!



माणगांव (प्रतिनिधी) :
रायगड जिल्ह्यातील तऴा तालुक्यातील ग्रामपंचायत मजगांव अंतर्गत मजगांव येथील कुणबीवाडी ग्रामस्थांनी नदीमधील गाऴ व रेती काढण्यासाठी गावकीचा मोडा करुन संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. गावातील कोवीड-19 नियंत्रण कक्ष म्हणजेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून दंवडी देऊनही नागरीक साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. अशा ग्रामस्थांच्या वागणुकीमुळे प्रशासनाच्या साथ रोग नियंत्रणप्रणालीमध्ये अडथऴा निर्माण होत असल्याने सरपंच शेवंती अबगुल यांनी गावामध्ये पोलीस प्रशासनाने पोलीस दलाचे जवान बंदोबस्तासाठी पाचारण करावेत अशी मागणी केली आहे.


ही ग्रामपंचायत तऴा तालुक्यात येत असून पोलीस स्टेशन हद्द म्हसऴा तालुका अंतर्गत येत आहे. तहसिल कार्यालय 25 किमी, तर पोलीस ठाणे 11 किमी अंतरावर लांब आहे. गावासाठी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेसाठी नजिकची बाजारपेठ म्हसऴा आहे. सध्या नुकतेच म्हसळ्याजवळीलच श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण पॉजीटीव्ह सापडले आहेत ही गांभीर्यजनक बाब आहे. मजगांव ग्रामपंचायतीची होमक्वारंटाईन संख्या 21 आहे तसेच बाहेरगावावरुन आलेल्या नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी संपलेल्या व्यक्तींची संख्या 365 इतकी आहे. अशी माहिती ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडुन प्राप्त झाली आहे. यामुऴे ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा अध्यादेश न पाळणाऱ्या नागरिकांसमोर प्रशासन हतबल झाले आहे. याकरिता पोलीस दलाच्या जवानांना गावात पाचारण करावे अशी मागणी इतर ग्रामस्थ व सरपंच तसेच सरकारी कर्मचारी करत आहेत.

Popular posts from this blog