खेड तालुक्यात खैराची तस्करी? वनविभागाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात!
रोहा (समीर बामुगडे) : खेड तालुक्यातील वनविभाच्या क्षेत्रात येणाऱ्या पोयनार या गावाच्या वाड्यात बेकायदेशीर सोलीव खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे समोर आले असून या तस्करीला वनअधिकाऱ्याचा वरदहस्त तर नाही ना? असा सवाल उठत असून चौकशी व कारवाईची मागणी निसर्गप्रेमींकडून जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील पोयनार गावाच्या दरम्यान खैर लाकडाची तस्करी होत असल्याची चर्चा होत होती याबाबत पत्रकार समीर बामुगडे यानी रत्नागिरी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर प्रत्यक्ष वनविभागच्या टिमने जागेवर जाऊन पंचनामा केला असताना वनअधिकरी बोराडे यांना खैराचा साठा आढळून आला. यानंतर खेडच्या वनविभागाला जाग आली.
याप्रकरणी झालेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात असून पोयनार दरम्यान होणाऱ्या खैर लाकडाच्या तस्करीचा बोभाटा झाल्यावर खेड वनविभाग खडबडून जागा झाला आहे. वनविभाग वनक्षेत्रातील वनपाल, कर्मचारी यांनी संयुक्तरित्या खेड तालुक्याच्या सरहद्दीवरील पोयनार गावचा खैर तस्कर बबलू सुर्वे याच्या बेडयात बेकायदेशीर खैराचा साठा वनविभागाने जप्त केला आहे. पुढील तपास वनअधिकरी बोराडे करीत आहेत. सदर या प्रकरणी वनअधिकरी माहिती देणयास टाळाटाळ करत असून सदर प्रकरण दडपुन ठेवले असल्याचे समजते. या खैर तस्करीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर योग्य त्या कारवाईची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.