🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨
रायगड जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई



रायगड (किशोर केणी) :
सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारचे दारु विक्रीवर शासनाने निबंध घातले असताना खालील पोलीस ठाणे हद्दीत सदर नियमांचे उल्लंघन केले बाबत गुन्हे दाखल आहेत.

1) मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत आरोपी रा. सासवने, ता. अलिबाग याने सासवणे येथे एकूण 4 हजार 988 रूपये किंमतीची विदेशी दारू गैरकायदा विनापरवाना विक्री करिता बाळगली. स्थितीत मिळून आला. सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गरनं 26/2020 दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 B, C प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक/891 घरत हे करीत आहेत.

2) म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत 02 आरोपी रा. बेलदारवाडी, ता. म्हसळा यांनी राज्यात सर्व कारोना विषाणू संसर्गाचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधीकारी रायगड यांनी संचारबंदीचे आदेश दिलेले असताना तसेच जिल्हयात दारूविकी पुर्णपणे बंदी असताना माहित असनही हयगयीचे कृत्य करून शासनाने वेळोवेळी आदेश दिले असताना आरोपी यांनी मौजे बेलदारवाडी येथे एकूण 2500/- रुपये किमतीची गावठी दारू विनापरवाना आपल्या ताबे कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला. याबाबत म्हसळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 12/2020, दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 D,E,F भा.द.वि.सं कलम 269, 270, 188, 34, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 चे कलम 51 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक/1303 जाधव हे करीत आहेत.

तरी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, शासनाने सद्यस्थितीत निर्गमित केलेले नियम पाळावेत तसेच या नियमांची कोणी पायमल्ली करीत असेल तर सबंधित पोलीस ठाणे अगर नियंत्रण कक्षास तात्काळ कळवावे.

Comments

Popular posts from this blog