राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी गीता पालरेचा यांची नियुक्ती
रोहे (सदानंद तांडेल) :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षपदी गीता पालरेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानिमित्ताने काेलाड विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरूणकर व उपप्राचार्य सुखदेव तिरमले तसेच सर्व कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गीताताईंनी आपले वडिल वसंतराव ओसवाल यांच्या प्रमाणेच जिल्ह्यात धडाडीने व प्रामाणिकपणे काम करुन या पदाला न्याय देईन अशी ग्वाही दिली.
यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, राज्य मंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांचे आभार मानले.