ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

१४ व्या जिल्हास्तरीय युनिफाईड स्पर्धेत पनवेल शहर संघाचा ऐतिहासिक डंका!

 ३७ सुवर्णपदकांसह पटकावले विजेतेपद 

​नवी मुंबई, दि. ८ (दिपक कायंदेकर) :- रायगड युनिफाईड असोसिएशनच्या विद्यमाने नुकतेच चांगू काना ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल येथे १४ व्या जिल्हास्तरीय युनिफाईड स्पर्धेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल शहर संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इतर संघांवर मात करत प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावून चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. संघाच्या या घवघवीत यशामध्ये खेळाडूंनी तब्बल ३७ सुवर्णपदके, १२ रौप्यपदके आणि ५ कांस्यपदके मिळवून पनवेलच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे.

​रायगड युनिफाइड असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. निलेश भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुखापूर, विचुंबे, आदई, कळंबोली, तक्का आणि कामोठे या विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांना युनिफाईड खेळाचे दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रांमधील मुख्य प्रशिक्षक सिद्धेश कदम सर, अनुज भोसले सर, सोहम सावंत सर, वीरेश राठोड सर, दीपेश सर, वनराज सर आणि अनिकेत दुशिंग सर यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे आणि खेळाडूंच्या शिस्तबद्ध सरावाचे हे फळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

​स्पर्धेदरम्यान सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंमध्ये वर्णिका रेड्डी, वैष्णवी सावंत, रिद्धी गरुड, क्रिधा भोसले, प्रिशा अंबरकर, श्रेयश गायकवाड, रुद्र भाईगडे, अमोघ दळवी, आरुष ठोंबरे, आरव नायर, साई पठाडे, रिद्धी सुर्वे, अद्विका गरगडे, निष्ठा चांदणे, अ रुद्रा, आरुष कालेल, स्वरा कालेल, हसन फारूक, अदिती मिश्रा, रुद्राणी आडाव, जीनथ शेख, अलिशा तांबोळी, सोहम इंगळे, ओम कोठावळे, आदर्श जयभय, संस्कार पवार, अभिनव घाटविस, श्रीयान हजारे, सिद्धी हजारे, लक्ष यादव, खुशी भोजने, अनिरुद्ध मुकणक, रेयांश गामिनी, धृती रमेश, ऋषिकेश कुमार, अमोघ दळवी आणि आदेशित चोगले या खेळाडूंचा समावेश आहे.

​तसेच उपविजेतेपद म्हणजेच रौप्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये स्वरा रामबडे, विनय ओझा, वेद परब, विवान सिंग, शौर्यवर्धन दांडी, इकरा तांबोळी, अदिथ अभिलाषा, पृथा पाटील, स्वराज पाटील, प्रांजल बने, शर्विल मिस्त्री आणि युवान सिंग यांनी उत्तम कामगिरी केली. यासोबतच देवांश घाटविस, सागर मोहिते, सचिन चव्हाण, आकाश चौधरी आणि प्रवेश पाटील या खेळाडूंनी कांस्यपदक मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

​श्री. प्रशांत गांगर्डे सर यांनी या संपूर्ण स्पर्धेचे अत्यंत नियोजनबद्ध व नेटके आयोजन केले होते. स्पर्धा पार पडल्यानंतर सर्व विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र युनिफाईड असोसिएशनचे सचिव मंदार पनवेलकर सर यांच्या हस्ते पदके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या या सर्व विजेत्या खेळाडूंची आता सातारा येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय युनिफाईड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशामुळे सर्व विजेत्या खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog