ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

शिवसेना (उबाठा) आयोजित दहीहंडी उत्सव समिती अध्यक्षपदी मुकेश भोय तर उपाध्यक्षपदी नागेश सुर्वे

 १५ वर्षांची परंपरा कायम 

नागोठणे-रायगड, दि. २५ (महेंद्र माने) :- येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागीय कार्यालयात आगामी दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, विभाग प्रमुख प्रकाश मेस्त्री आणि शाखाप्रमुख राजेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत शिवसेना व युवासेना शाखा नागोठणे आयोजित दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुकेश भोय तर उपाध्यक्षपदी नागेश सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे नागोठणे शाखेची गेली १५ वर्षांची दहीहंडी उत्सवाची गौरवशाली परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीला विभागातील शिवसेना-युवासेनेचे अनेक पदाधिकारी, सदस्य, शिवसैनिक तसेच युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या बैठकीमध्ये सर्वानुमते संपूर्ण कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी मुकेश भोय आणि उपाध्यक्षपदी नागेश सुर्वे यांच्यासह सेक्रेटरीपदी सलीम अत्तार, सहसेक्रेटरीपदी सोहेल पानसरे व संजय पाटील, खजिनदारपदी विकास वादळ, कार्याध्यक्षपदी इमरान पानसरे व कैलास गोरे यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून कीर्ती कुमार कळस, बाळू रटाटे, श्रीराम मांगले, सलीम शिंदी, चेतन कामथे, संदीप राऊत आणि अविनाश भोसले यांची नियुक्ती झाली. याव्यतिरिक्त सदस्यपदी दीपक गायकवाड, मनोज कोळी, प्रवीण चितळे, राकेश चितळकर, शेखर ज्योगत, रुपेश जगताप, प्रसाद कोळी, संदीप शिर्के, मोहन फोंडे व स्वप्निल शिर्के यांची निवड करण्यात आली.

​याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे यांनी सांगितले की, हिंदूंचे सर्व सण आणि उत्सव जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यानुसार हा दहीहंडी उत्सव ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्व नेते व कार्यकर्ते कसून तयारी करत आहेत. विभाग प्रमुख प्रकाश मेस्त्री यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, नागोठणे शिवसेना शाखेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे सलग हा उत्सव परंपरेनुसार साजरा केला जात असून यंदाही हा सण अत्यंत भव्यदिव्य करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे. नवनियुक्त अध्यक्ष मुकेश भोय यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उत्सवाचे नेटके नियोजन, सुरक्षेचे सर्व नियम आणि सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यावर समितीचा मुख्य भर असेल. हा धार्मिक व पारंपरिक उत्सव शांततेत आणि शिस्तीत यशस्वी करण्यासाठी संपूर्ण समिती कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीच्या शेवटी शाखाप्रमुख राजेश सुर्वे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व शिवसैनिकांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog