ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

श्री रामायण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांकडून खाटू श्यामजींचे भावपूर्ण दर्शन

रींगस-राजस्थान, दि. १४ (प्रतिनिधी) :- ​राजस्थानमधील प्रसिद्ध व पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री खाटू श्यामजींच्या मंदिरात श्री रामायण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि श्री रामायण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेदरम्यान सर्व सदस्यांनी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाच्या वातावरणात खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. तसेच सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संपूर्ण कुटुंबाच्या मंगलमय भविष्यासाठी श्याम बाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.  

​या धार्मिक प्रवासात देवतादीन दुबे, बसवराज बिरादर, हरिनारायण सिंह, शिवधर मौर्य, अरविंद पांडे, दुर्ग विजय प्रजापती, घूरा प्रजापती, कमलेश प्रजापती, सौरभ मौर्य, आकाश बिरादार, रणविजय सिंग, दीपचंद्र राय, अनिल सर आणि राजू मोरे या सदस्यांनी प्रमुख सहभाग घेतला होता.

​"हारे का सहारा, बाबा श्याम हमारा" या अखंड श्रद्धेने आणि जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सर्व सदस्यांनी श्याम बाबांचा आशीर्वाद घेतला असून हा भक्तिमय प्रवास प्रत्येकासाठी अत्यंत आनंददायी व अविस्मरणीय अनुभव ठरला. श्री श्याम बाबांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी कायम नांदो, अशी मनःपूर्वक प्रार्थना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. 

Comments

Popular posts from this blog