ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

अलिबाग शहरातील वाहतूक व पार्किंग आराखड्यास मंजुरी! 

रिक्षा-टॅक्सी चालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

अलिबाग, दि. १२ (स्वप्निल नाईक) :- अलिबाग नगरपालिकेने तयार केलेल्या अलिबाग शहराच्या वाहतूक व पार्किंग आराखड्यास पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी मंजुरी देत अधिसूचना जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सेवा देणाऱ्या तीन आसनी, सहा आसनी रिक्षा चालक-मालक तसेच टॅक्सी चालक-मालकांची महत्त्वपूर्ण बैठक आज आयोजित करण्यात आली.


बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, वाढती वाहतूक कोंडी तसेच अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्या आराखड्यानुसार शहरात पार्किंग, नो पार्किंग, सम-विषम पार्किंग तसेच वाहन थांबे याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
नगरपालिका प्रशासनाने या नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अलिबाग शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतुकीची समस्या निश्चित दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. शहरातील नागरिकांना अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या आराखड्याचा मुख्य उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस नगराध्यक्ष अक्षय नाईक, मुख्याधिकारी श्री. सागर सालुंखे, आरटीओ विभागाचे कारवार साहेब, तुपसमुद्रे साहेब, वाहतूक शाखेच्या एपीआय मीरा लाड-मंडण, झेमसे साहेब यांच्यासह शहरातील सर्व रिक्षा व टॅक्सी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून संबंधित चालक-मालकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.

Comments

Popular posts from this blog