ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

कुंडलिका नदीच्या पुरात अडकलेल्या प्रवाशांसाठी भाजप तालुकाध्यक्ष महेशदादा ठाकूर ठरले ‘देवदूत’

 रात्रभर राबवले मदतकार्य 

रोहा-रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- ​रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीला आलेल्या भीषण पुरामुळे आजूबाजूच्या गावांना आणि मुख्य रस्त्यांना पुराचा मोठा तडखा बसला. या आपत्कालीन परिस्थितीत रोहा-कोलाड मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि प्रवाशांना सुरक्षित ठेवता यावे, यासाठी भाजप रोहा तालुका अध्यक्ष श्री. महेशदादा ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कौतुकास्पद कामगिरी केली. ५ आणि ६ जुलै रोजी सलग दोन दिवस, दिवस-रात्र २४ तास महेशदादा ठाकूर आणि त्यांच्या टीमने रोहा-कोलाड मार्गावरील पालेखुर्द ते अशोकनगर दरम्यानच्या धोकादायक वळणावर अडकलेल्या अनेक गाड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. रोहाचे तहसीलदार श्री. किशोर देशमुख आणि कोलाड पोलीस स्टेशनचे एपीआय श्री. फारणे साहेब यांच्याशी योग्य समन्वय ठेवत त्यांनी हे बचावकार्य राबवले.

​रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा वेढा कमालीचा वाढल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. अशा वेळी कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून महेशदादा ठाकूर स्वतः आपल्या कार्यकर्त्यांच्या टीमसह पूर्ण रात्र घटनास्थळावर तळ ठोकून उपस्थित होते. या भागात अडकलेल्या एसटी बसमधील प्रवासी, कारचालक, एमआयडीसी (MIDC) मध्ये जाणारे मोठे कंटेनर, डम्पर आणि इतर विविध वाहनांमधील प्रवाशांना त्यांनी सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी मोलाची मदत केली. पूरपरिस्थितीच्या अंधाऱ्या रात्री रोहा-कोलाड मार्गावरून जाणाऱ्या शेकडो प्रवाशांसाठी आणि वाहनधारकांसाठी महेशदादा ठाकूर व त्यांचे सहकारी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले असून, त्यांच्या या तत्परतेबद्दल सर्व स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog