ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-2026
मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी

रायगड-अलिबाग, दि. ४ (प्रतिनिधी) :-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी  जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी घालण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी  किशन  जावळे यांनी  निर्गमित केले आहेत.
रायगड जिल्ह्यात शनिवार, दि.07 फेब्रुवारीला मतदान तर सोमवार, दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.   मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण न येता आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, या उद्देशाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी यांनी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत शनिवार, दि.07 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक रायगड यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघांमध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो, अशा सर्व ठिकाणी आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशामुळे मतदान केंद्रांच्या परिसरात गर्दी टाळणे, वाहतुकीचा अडथळा कमी करणे आणि मतदारांना मतदानासाठी मोकळे व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Comments

Popular posts from this blog