ब्रेकिंग न्यूज
🚨 राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड.!🚨

आदर्श पतसंस्थेत श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न
नागोठणे शाखेत चौथा वर्धापन दिन साजरा

नागोठणे (महेंद्र माने) :- येथील आदर्श पतसंस्थेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाखेत श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती.

अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेच्या नागोठणे शाखेला यशस्वी रित्या चार वर्षे पूर्ण झाले असून शाखेचा एकत्रित व्यवसाय 39.26 कोटी पर्यंत झाला आहे. शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनी निमित्त ठेवण्यात असलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11  वाजता सुभाष शिदोरे गुरुजी या पुरोहितांच्या उपस्थितीत श्री व सौ प्रकाश आरेकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. दिवसभरात विविध कार्यक्रमाचा तसेच महापुजा व तीर्थ प्रसादाचा लाभ शाखेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्यासह नागोठणे शहर व विभागातील नागरिकांनी घेतला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अलिबाग शाखा रिजनल मॅनेजर ग्रीष्मा सातमकर व नागोठणे शाखा मॅनेजर पूर्वा वैद्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कॅशियर ललिता नागोठकर, कर्ज विभाग प्रमुख अनिल नागोठणेकर, सिनियर ऑफिसर भूषण नागोठणेकर, शामल आरेकर व अदिती रुपेश पाटील यांच्यासह कर्मचारी वर्गांनी विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog