🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

लाचखोर भू-मोजणी कर्मचाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक


श्रीवर्धन (रूपेश नाक्ती) :- म्हसळा भूमिलेख कार्यालयातील भू-करमापक (सर्वेअर) विशाल भीमा रसाळ (वय २९) याला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. तक्रारदार यांच्या वरवटणे, ता. म्हसळा येथील सर्व्हे नं. ५२/१ (ब) या जमिनीची मोजणी आकारफोड व ‘क’ प्रत देणे करिता आरोपी रसाळ याने ५० हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून भूमोजणी कर्मचाऱ्याला अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड चे पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, पो.हवा./2180 महेश पाटील, चा.पो.हवा./1321 सागर पाटील यांच्या पथकाने केली.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग कार्यालय दुरध्वनी - 02141-222331/ टोल फ्रि क्रं. 1064, शशीकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड अलिबाग. मोबाईल क्रमांक 9870332291 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog