महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशनचा उपक्रम
रोह्यातील विविध यशस्वी व्यवसायिकांचा सन्मान
रोहा (विशेष प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील विविध यशस्वी व्यवसायिकाचा सन्मान महाराष्ट्र बिझनेस क्लब आणि दसबा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र बिझनेस कोच विजय कोटगोंड, पी. पी. बारदेस्कर, विजयराव मोरे, मिलिंद अष्टिवकर, सुहास खरिवले, सुरेश मगर, शंकर भगत, रामचंद्र सकपाळ, मुख्य समन्वयक योगेश कडवेकर, अनिल भगत, ज्ञानेश्वर साळुंखे, अमित घाग, प्रदीप बामुगडे, अमित मोहिते, सुनील ठाकूर, गजानन बामणे, गुणाजी पोटफोडे, रविंद्र मरवडे, दसबा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश बामुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील नामवंत आणि यशस्वी व्यावसायिकांच्या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १८ ऑगस्ट रोजी आरआयआरसी हॉल, धाटाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते नामांकित व्यवसायिकांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र बिझनेस कोच विजय कोटगोंड यांनी "गरुड झेप स्वप्नांच्या दिशेने" यावर युवा व्यावसायिकांना मौलिक मार्गदर्शन केले.
प्रगत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, बांधकाम पुरक व्यवसाय, व्यापारी, उद्योजक, वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पंचवीस पेक्षा जास्त व्यवसायिकांचा विशेष सन्मान या कार्यक्रमातून करण्यात आला. याप्रसंगी अर्जुन (प्लंबर) गोरीवले, नरेंद्रशेठ जाधव, मंगेश भोईर, जितेंद्र गिजे, गीतराज म्हस्के, धर्मराज माने, अशोक कोतवाल, सुमित गोपिलकर, रामचंद्र नाकती, सखाराम बर्जे, अनंत मगर, नितीन बामुगडे, नारायण भोसले, नारायण कान्हेकर, नामदेव म्हसकर, राजेश कदम, निवास पवार, अभिषेक गोतावडे, अक्षता शिंदे, रुचिका जैन, विजय जाधव, मनीष खिरीट, गणेश भोकटे पराग मोरे यांना सन्मानीत करण्यात.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भगत यांनी केले तर प्रास्ताविक दसबा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महेश बामुगडे यांनी केले. रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष तथा उद्योजक पि पि बारदेसकर आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यवसायिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.