लायन्स क्लब अध्यक्षपदी सुनिल कुथे, तर सेक्रेटरी पदावर डॉ. अनिल गीते

नागोठणे (महेंद्र माने) :- लायन्स क्लब या जागतीक पातळीवरील सामाजिक सेवेतील नामांकित एक अग्रगण्य संस्थाच्या नागोठणे संस्थेची रविवार दि. 23 जून रोजी झालेल्या समारंभात अध्यक्षपदी सुनिल कुथे तर सेक्रेटरी पदी डॉ. अनिल गीते यांची निवड करण्यात आली. यावेळी रिजन चेअरमन लायन विजय वनगे, झोन चेअरमन लायन विवेक सुभेकर, डिस्ट्रीक्ट कॅबिनेट जॉईन्ट सेक्रेटरी नुरुद्दीन रोहावाला, तसेच डिस्ट्रीक्टचे मायक्रो कॅबीनेटचे अनिल म्हात्रे, विजय गणात्रा, नयन कवळे तर डिस्ट्रिक्ट चेअरमन यशवंत चित्रे हे उपस्थित होते. 

डिस्ट्रिक्ट 3231A4 चे व्हाईस गव्हर्नर एमजेएफ लायन प्रविण सरनाईक यांचे शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन शिवप्रतिमेचे पुजन, प्रतिज्ञा व राष्ट्रगीताने करण्यात आले. येथील लायन्स क्लबच्या वतीने मागील 30 वर्ष सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून अविरत सेवा चालू आहे. रविवार दि 23 जुन रोजी झालेल्या शपथविधी समारंभात गव्हर्नर लायन प्रविण सरनाईक यांनी अध्यक्ष सुनिल कुथे, उपाध्यक्ष संतोष शहासने, सचिव डॉ अनिल गिते, खजिनदार दिपक गायकवाड सह सर्व कार्यकारणीला शपथ देवून राधिका हेलेकर, दिपीका गायकवाड, अतुल काळे, सचिन कळसकर, दीपक दाईटकर, विद्या म्हात्रे, नजमुद्दीन व्होर, रमेश झोलगे, डॉ. साधना झोलगे या नवीन सदस्यांचा शपथविधी देऊन त्यांना गव्हर्नरच्या हस्ते सन्मानाने लायन्स परिवारात सामावून घेतले. या सोहळ्या अंतर्गत लायन्स परिवारातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यामधे डिस्ट्रीक्टमधून जवळपास दहा वर्षांनी गव्हर्नरच्या इलेक्शनमधे रायगडचा गव्हर्नर झाला याचा आनंद म्हणून प्रविण सरनाईक यांचा लायन्स क्लब तर्फे शाल, श्रीफळ,सन्मान चिन्ह व गणेशमूर्ती देवून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सरनाईक त्यांनी माझी नागोठणे क्लबला कोणतीही आवश्यकता असेल ती मी पुर्ण करेन असे आश्वासन दिले. यावेळी डिस्ट्रीक्टकडून लायन्स क्लब नागोठणेसाठी चांगल्या सामाजिक कार्यासाठी गोल्ड मेडल तर उत्तम सेक्रेटरीपदाच्या कार्याबद्दल विवेक सुभेकर, झोन चेअरमन यशवंत चित्रे व डिस्ट्रीक्ट चेअरमन प्रकाश जैन यांना गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले. नवनिर्वाचित सुनिल कुथे यांनी पदभार हाती घेताना मी यावर्षी सर्व सदस्यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेवून चांगल काम करीन याची ग्वाही दिली. या सोहळयास विवेक करडे, सुधाकर जवके, विलास चौलकर, विनोद सावंत,संजय काकडे, सुजाता जवके, स्मिता कुथे, दिपक लोणारी, अमित मोदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काटकर व ॲड. स्मिता कुथे यांनी केले तर आभार प्रदर्शन लायन डॉ अनिल गिते यांनी केले.

Popular posts from this blog