ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

क्लॅरियंट कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल

रोहा : किरण मोरे 

धाटाव औद्योगिक परिसरातील क्लॅरियंट कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असून येथील प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

क्लॅरियंट कंपनी शासनाने निर्गमित केलेले नियम धाब्यावर बसवून कर्तव्य करीत आहे, जसे की.... १) किमान क्षेत्रमर्यादा २) किमान आवश्यक पोचरस्ता ३) पाणी पुरवठा उपलब्धता ४) रहिवास वापर विभाग बदल प्रस्तावामधील सोयी सुविधा मधिल सुनिश्चीतता ५) औद्योगिक धोरणाशी व औद्योगिक स्थाननिश्चयन धोरणाशी सुसंगतता ६) विद्यमान औद्योगिक घटकांच्या विस्तारासाठी आवश्यक विभाग बदल ७) प्रदुषण नियंत्रण व व्यवस्था याबाबत गैरवर्तन ८) नैसर्गिक दृष्ट्या संवेदनशील स्थानिक जमिनीबाबत प्रस्ताव छाननी समीतीसाठी वापर विभाग बदल विषयी मार्गदर्शक तत्वे.

प्रस्थापित जागेत पुर्वीचे नाव कलरकेम केमिकल व सद्याचे नाव क्लॅरियंट केमिकल असे असून ही कंपनी रोठखुर्द गावाशेजारी व येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला लागून प्रस्थापित आहे. याआधी या कंपनीला दिलेली जमीन ही देखील स्थानिक नागरिकांची भूसंपादन केलेली असल्याने वरील तत्वाने कंपनीने नागरिकांना द्यावयाच्या सुविधा असतात त्या न देता उलट स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा अडमुठी दंडेलशाही प्रवृतीने वागणारा येथील व्यवस्थापन आहे. भर दिवसाढवळ्या प्रदुषित वायू सोडणे, नदीनाल्याद्वारे केमिकल युक्त प्रदुषित पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने येथील शेतकरी यांची शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच वायु गळती व पाण्याच्या अशा गैरकृत्याने स्थानिक नागरिकांना गावात राहणे मुश्किल झाले आहे. मुलेबाळे, गुरेढोरे, वारंवार अजारी पडत आहेत. यातून सारे जनजीवन विस्कळित झालेले आहे.

सदर कारखान्याने प्रदुषणाबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केलेली दिसत नाहीत. समीतीमधील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील प्रादेशिक अधिकारी यांनी प्रत्यक्षात पहाणी करुन स्थानिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog