साई ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुधारीत नळपाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी

साई/माणगांव : हरेश मोरे

जलजीवन मिशन योजने अंतर्गत साई ग्रामपंचायतीसाठी सुधारीत नळपाणीपुरवठा योजनेचे प्रशासकीय मंजुरीचे पत्र रायगड रत्नागिरीचे खा. सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून सुतारवाडी येथे 4 सप्टेंबर रोजी देण्यात आले.

सदर योजनेसाठी 2,70,75,517 (दोन कोटी सत्तर लाख पंच्यातर हजार पाचशे सतरा) रक्कमेचा निधी उपलब्ध आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन हे 21 मे 2022 रोजी करण्यात आले होते.

खा. तटकरे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे साई ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मंजुरीचा आदेश खा. तटकरे यांनी साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेन रहाटविलकर, जमातीचे अध्यक्ष मौलाना कासीम सोलकर, बशीर सोलकर, उस्मान चिलवान, जमातीचे माजी अध्यक्ष लियाकत राऊत, गनी सोलकर, अब्दाला कोंडविलकर, सईद दळवी व राष्ट्रवादी काँग्रेसचे साई विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog