ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

कॅन्सर कंट्रोल मिशन यांच्यातर्फे कोलाड विद्यालयास दोन कॅन्सर कंट्रोल युनिट भेट 

कोलाड : सदानंद तांडेल 

द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथील धनश्री लोखंडे या माजी विद्यार्थिनीच्या पुढाकाराने कॅन्सर कंट्रोल मिशन या एनजीओने कोलाड विद्यालयास दोन कॅन्सर कंट्रोल युनिट भेट दिले. कंपनीच्या सीआरसी फंडातून हे उपलब्ध करण्यात आले. कॅन्सर कंट्रोल मिशन ही एक सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. 

या एनजीओ मार्फत समाजात पसरणाऱ्या कॅन्सर सारख्या भयानक रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी नेहमीच मदतीचा हात दिला जातो. समाजात कॅन्सर सारख्या आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना या एनजीओमार्फत आर्थिक सहाय्यही केले जाते. ही सामाजिक संघटना विशेषता मुलींच्या व महिलांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्नशील असते. या संघटनेने कोलाड विद्यालयास सॅनिटायझर पॅड डिसपोजल करण्यासाठी दोन कॅन्सर कंट्रोल युनिट भेट दिले. या कार्यक्रमासाठी पुष्पेन्द्र राज, सुनित दुबे, सुप्रिया पांडे व धनश्री लोखंडे हे एनजीओ चे कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरुणकर यांनी या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विद्यालयातर्फे व संस्थेतर्फे विशेष आभार मानले. यावेळी उपमुख्याध्यापक शकील मोरवे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments