🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

सुधागड मधील तस्करीचा पर्दाफाश!

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

रायगड (समीर बामुगडे) : खवले मांजर तस्करी प्रकरणात सुधागड वनविभाग कार्यालयाने नवघर येथे सापळा रचून तस्करांना अटक केली.  हिरामण बेंडू हिलम (रा. कुंभारशेत, ता. सुधागड, जि. रायगड), दशरथ लक्ष्मण वालेकर (रा. झाप आदिवासी वाडी, ता. सुधागड, जि. रायगड), अनिल भागू वाघमारे (रा. चावसर, ता. मावळ, जि. पुणे), रमेश अंकुश जाधव, रा. वांद्रे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 


मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी नाडसुर ते जांभूळपाडा रोडवर दोन संशयित मोटरसायकली थांबवून चौकशी केली असता, अनिल भागू वाघमारे याच्या पाठीवरील बॅग तपासली असता, गोणपाटात झाकून ठेवलेले खवले मांजर व एक पिल्लू दिसून आले.  

आरोपींसह त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन मोटरसायकल ताब्यात घेवून वनपरिक्षेत्र कार्यालय, सुधागड येथे त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39(3), 44(1)(अ), 48 (अ), 49, 50, 51, 51(अ) अन्वये कळंब रौ.गु.नं. WL01/2021-22 दिनांक 06/05/2021 ची नोंद करून आरोपींना अटक करण्यात आले.  उपवनसंरक्षक आशीष ठाकरे व सहाय्यक वनसंरक्षक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी समीर शिंदे व त्यांची टीम यांनी ही मोहीम यशस्वी केल्याने त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

खवले मांजर हा दुर्मिळ प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही वर्षात तस्करीच्या उद्देशाने खवले मांजराची शिकार वाढली आहे. खवले मांजर या वन्य प्राण्याबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत.  त्यातूनच सामान्य लोकांकडून खवले मांजराला मांसासाठी, तसेच जादूटोणासारख्या अंधश्रद्धेसाठी पकडण्यात येते. परंतु वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये, तस्करी करताना सापडल्यास तीन ते सात वर्षापर्यंत कैद व काही हजार रुपयांची दंडाची तरतूद आहे. अशा प्रकारे कोणतीही माहिती असल्यास 1926 या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून माहिती दिल्यास आपण या व इतर वन्यजीवांना वाचवण्याचे चांगले कार्य करू शकतो.

Comments

Popular posts from this blog