ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

आयोध्येतील श्रीराम मंदीराच्या निर्माणासाठी देगाव येथील श्री. काशिनाथ गायकवाड यांच्याकडून ११ हजारांचा धनादेश 

माणगांव (राजन पाटील) : संपूर्ण देशात आयोध्येतील श्रीराम मंदीराच्या निर्माणासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी श्रीराम मंदीर निधी समर्पणाचा कार्यक्रम चालू आहे. गावागावांत आणि शहराशहरांत श्रीराम भक्त निधी समर्पणासाठी काम करीत आहेत. 

रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील देगाव येथील सावित्री प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष श्री. काशिनाथ गायकवाड यांनी या श्रीराम मंदीर निर्माणासाठी ११ हजार रूपयांचा धनादेश जनसेवा संघटनेचे अध्यक्ष तथा श्रीराम भक्त अॅड. अनिकेत ठाकूर व त्यांच्यासमवेत असलेले पत्रकार भिवा पवार व रामदास सावंत यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला आहे. 

श्री. काशिनाथ गायकवाड हे सामाजिक कार्यांत अग्रेसर असून ते दरवर्षी आपल्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून व्यवसाय मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी वाड्यांवर दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम करत असतात. त्यांचे सुपूत्र अॅड. अनिकेत ठाकूर यांनीही आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्यांचा वारसा समोर ठेवून जनसेवा संघटनेची स्थापना करून आज माणगांव तालुक्यात दीनदुबळे वंचित व समाजातील सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडतात. समाजात विधायक बदल घडून येण्यासाठी तसेच तरूण वर्गाला व्यवसाय मार्गदर्शनाची दिशा देण्यासाठी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर हे सातत्याने प्रयत्नशील असतात. आपल्या विधीज्ञतेचा वापर करून ते सर्वसामान्यांसाठी उपयोगी पडतात.

Comments

Popular posts from this blog