🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती शाखा म्हसळा यांच्या वतीने कोविड योद्धा सन्मान सोहळा

म्हसळा : रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती शाखा म्हसळा यांच्या वतीने कोविड-19 च्या प्रादुर्भाव काळात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या तालुक्यातील शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

पुरस्कारात शाल, कोविड योध्दा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. म्हसळा तालुक्यातील एकूण २५ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, राज्य प्रवक्ते सतीश हुले, रायगड जिल्हाध्यक्ष संजय पोईलकर, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे म्हसळा तालुका अध्यक्ष सुनील पवार, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजी गटाचे तालुका अध्यक्ष नरेश सावंत, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश राव, पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक नितीन गर्जे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन गिजे, अलिबाग तालुका अध्यक्ष निलेश तुरे, खालापूर तालुका अध्यक्ष सुनील पांगारे, सुधागड तालुका अध्यक्ष पांडुरंग पारधी, माणगांव तालुका अध्यक्ष सचिन गंगावणे, सचिन कांबळे (अलिबाग), सुभाष ओव्हाळ (माणगांव), हरिश्चंद्र साळुंखे (खालापूर), विनायक शिंदे (रोहा) व म्हसळा तालुक्यातील सर्व संघटनांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात विस्तृत माहिती देत म्हसळा तालुक्यात शिक्षणाचे ऑनलाईन कार्य करीत असताना शिक्षक कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेला शासनाच्या आदेशान्वये सूचित आणि जागरूक करण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षक भारतीने राबविलेल्या कोविड योद्धा पुरस्कार सोहळ्याचे अभिनंदन केले. शिक्षक भारतीच्या या उपक्रमाने खऱ्या अर्थाने शिक्षक करीत असलेल्या कोविड-१९ च्या कार्याची दखल घेतली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील शिक्षकांच्या अनेक प्रश्नांविषयी विस्तृत चर्चा केली. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षक भारती शिक्षकांचे प्रश्न सोडवीत असतानाच समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुद्धा करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिक्षक भारती संघटना म्हसळा तालुक्यात वाढण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या व स्वतः शिक्षक भारती संघटनेने केलेल्या आवाहनास नेहमीच सहकार्य करण्यासाठी तत्पर असू असे सांगितले. संघटनेवर विश्वास ठेवून शिक्षकांनी पदाधिकारी यांच्या समवेत रहावे. म्हसळा गटात वेगवेगळ्या संघटना असल्या तरी प्रसंगाला शिक्षक म्हणून सर्व एकत्र असतात. शिक्षकांच्या आशिर्वादाने मी कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतलो यामुळे मी यापुढेही शिक्षकांच्या कामासाठी सदैव तत्पर राहीन. 

राज्य प्रवक्ते सतीश हुले यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीबाबत माहिती दिली. शिक्षक भारती संघटनेचे नेते व सन्माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब यांच्या शिक्षकांच्या हिताच्या बाबतीत  घेतलेल्या भूमिका व शिक्षकांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात शासनाशी केलेला संघर्ष प्रकर्षाने मांडला. जिल्हाध्यक्ष संजय पोईलकर यांनी जिल्हा संघटना नेहमीच जिल्ह्यातील शिक्षकांची  समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. शिक्षक संघ शिवाजी गटाचे तालुका अध्यक्ष नरेश सावंत यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील शिक्षक संघटना जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी म्हसळा तालुक्यात मात्र सर्व संघटनांच्या समन्वय असून शिक्षक हितासाठी सर्व संघटना एकत्र येऊन कार्य करतात हे सांगितले. त्यांनी शिक्षक भारतीच्या उपक्रमाचे कौतुक केले. व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये पेण शिक्षक पतपेढीचे संचालक नितीन गर्जे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश राव, प्रकाश मांडवकर, प्रमोद फकीरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक भारतीच्या उपक्रमाचे कौतुक करून संघटनेने केलेल्या कोविड योध्दा सन्मानाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य शिक्षक वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष राहूल नाईक यांनी केले. संतोष बोतरे व दर्शना पवार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित महागावकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog