🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

श्रीवर्धन तालुका श्रमिक पत्रकार संघाची स्थापना

बोर्लीपंचतन (मुजफ्फर अलवारे) :

बोर्लीपंचतन येथे विजयादशमीच्या मुहुर्तावर श्रीवर्धन तालुका श्रमीक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. संघांच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उदय कळस तर उपाध्यक्षपदी श्रीकांत शेलार, सचिव सर्फराज दर्जी, खजिनदार रविंद्र पेरवे यांची एकमताने निवड करण्यात आली असून संघांचे सदस्य गणेश प्रभाळे, विजय कांबळे, मकरंद जाधव, अमोल चांदोरकर, मुजफ्फर अलवारे, कुणाल माळवदे केतन माळवदे या सर्वांच्या सहभागातून श्रमीक पत्रकार संघ यापुढे तालुक्यामध्ये कार्यरत असणार आहे. बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाणे येथे श्रीवर्धन उपविभागीय पोलीस आधिक्षक श्री. बापुराव पवार यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र शेलार यांना पत्रकार संघाची स्यापना व पुढील कामकाजाबाबत निवेदन देऊन विवीध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पत्रकार हा सामान्य नागरिकांपेक्षा कधीही वेगळा नसतोच. जनसामान्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम पत्रकार करीत असतो.कोणत्याही प्रकरणातील सत्य काय आहे याचा शोध घेत, बातमीचा पाठपुरावा करत ते सत्य लोकांसमोर निर्भिडपणे व निपक्षपणे सादर करणे हीच पत्रकारितेची खरी व्याख्या आहे.

पत्रकारांना सर्वच बातम्या द्याव्या लागतात. त्यामुळे काही वेळा विवीध पक्षाचे लोकप्रतिनीधी, स्थानिक पुढारी नोकरदार, व्यावसायिकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. वार्तांकन हा आपल्या कामाचा भाग असून त्यात आपण वैयक्तिक कोणाची बाजू न घेता काम करण्याचा प्रयत्न त्याचबरोबर आपण सर्वांचे मित्र आहोत कोणाचेच शत्रू नाही पत्रकारांच्या लेखणीतूनच जनतेसमोर समाजातील प्रश्न व समस्या येत असतात.तळागाळातील ग्रामीण जनतेला न्याय देण्याचे काम व शेवटच्या घटकापर्यतच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पत्रकार तत्पर असतो. ग्राम विकासात पत्रकाराची भूमिका महत्त्वाची आहे.

त्या आधारे ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे अशीच श्रमीक पत्रकार संघाची कार्यपद्धती असेल असे प्रतिपादन अध्यक्ष उदय कळस व उपाध्यक्ष श्रीकांत शेलार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog