ज्येष्ठ समाजसेवक संजय साबळे यांच्याकडून पुन्हा एकदा मदतीचा हात, सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या पॅकेजचे वाटप 


माणगांव (उत्तम तांबे) : जागतिक कोरोना साथीला लढा देण्यासाठी शासन व सामाजिक संस्था व दानशुरांनी कंबर कसली असुन गोरगरीब गरजू नागरीकांना विविध प्रकारे मदत करीत आहेत. याच पार्श्वभूमिवर ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा साबळे यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. बुधवार दि .६ मे २० रोजी स्वेच्छेने नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तुंच्या पॅकेजचे वाटप केले.


कोरोना पार्श्वभूमिवर १४ एप्रिल २० रोजी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती महोत्सवानिमित्ताने जेष्ठ समाजसेवक संजय अण्णा साबळे व त्यांचे सहकारी मित्र दानशूर वजीर अहमद उभारे तसेच इंदापूर उपसरपंच उदय अधिकारी यांनी अडीच लाख रुपये उपलब्ध करून गोरगरीब, कष्टकरी कामगार गरजवंतांना जिवनावश्यक वस्तूंचे ११०० पॅकेजचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना पॅकेजचे वाटप करण्यात राहिले होते. ती उणीव संजय अण्णा साबळे यांच्या मनात राहिल्याने त्यांचे प्रतिनीधी सह्याद्री बझारचे संचालक, माणगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम तांबे यांच्या हस्ते माणगाव नगरपंचायत येथील ३३ सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तुंच्या पॅकेजचे वाटप करण्यात आले. यावेळी या सफाई कामगारांना नगरपंचायतीतर्फे टिफीनबॉक्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती रत्नाकर उभारे, पाणी पुरवठा व समाजिक न्याय समिती सभापती जयंत बोडेरे यांनी उपस्थिती दर्शविली होती.

Popular posts from this blog