ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटी - उद्धव ठाकरेंची घोषणा 



अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

तसेच, या ठिकाणी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन निर्मितीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "गेल्या काही दिवसांत मी तीन वेळा अयोध्येत आलो आहे. शिवसेनेची मागणी होती सरकारने विशेष कायदा बनवून राममंदिर बांधावे, पण कायदा झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री होईन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण, तसे झाले. दीड वर्षात तीन वेळा अयोध्येत आलो आहे. मी येथे नियमित येणार आहे. शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती. मात्र, कोरोना व्हायरमुळे शरयू नदीची आरती करू शकत नाही. पण, यासाठी मी पुन्हा येईन."

Comments

Popular posts from this blog