रा.जि.प. शाळा भुवन येथे राष्ट्रीय छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष निलेश महाडीक यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोलाड : प्रतिनिधी
भुवन येथील रा.जि.प. शाळा भुवन येथे राष्ट्रीय छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष निलेश महाडीक यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री निलेश महाडीक हे पुई गावचे तरूण व आदर्श समाजसुधारक असून त्यांना शिक्षणाविषयी प्रचंड आवड दिसुन येते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांमी अनमोल मार्गदर्शन केले. शाळा ही जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. खुप शिका, मोठे व्हा समाजाचे ऋण फेडा. तसेच आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या गुरूचेही नाव कमवा. तुमचे हे शिक्षण वाया जाणार नाही या कडे लक्ष द्या. जीवनात व्यसनाधीनतेकडे वळू नका असा मोलाचा संदेश यावेळी निलेशभाई महाडीक यांनी दिला.
यावेळी छावा संघटनेचे कोलाड शहर अध्यक्ष ईकिंदर शेवाले, कोकण विभागीय उपाध्यक्ष राजु सुतार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रूपेशजी कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक आनंदराव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.