देवा ग्रुप फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य व "जिवलग मित्र परिवार माणगांव" यांजकडुन गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप

माणगांव (प्रतिनिधी) :
देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व जिवलग मित्र परिवार माणगांव यांच्या वतीने सर्व विकास दीप संस्थेमधील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सुमारे ८० विद्यार्थ्यांना दैंनदिन जीवनात लागणाऱ्या शालोपयोगी वस्तुंच्या वाटपाचा कार्यक्रम देवा ग्रुप फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य चे सचिव तानाजीभाऊ मोरे व सर्वांचे लाडके अविनाशभाई फोडसे (ऊर्फ गोट्याभाई) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे माणगांव तालुक्यातील आयोजन व नियोजनासाठी धनाजी खरात (डीके) (सदस्य देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य) व जिवलग मित्र परीवार माणगांवचे अध्यक्ष अल्पेशदादा कापडेकर व अविभाऊ म्हस्के, अमोलजी पवार, मंदारभाऊ खडतर, सुरजदादा भिंगारे यांची उपस्थिती होती. तसेच त्यांच्या समवेत असंख्य मित्रपरिवार देखील उपस्थित होता.
   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुर्यकांतभाऊ गावणकर (अध्यक्ष कुर्ला तालुका देवा ग्रुप फाऊंडेशन मुंबई),  विकीभाऊ रामाणे (अध्यक्ष रोहा तालुका देवा ग्रुप फाऊंडेशन रायगड), अल्पेशभाऊ मंचेकर (अध्यक्ष इंदापुर विभाग देवा ग्रुप फाऊंडेशन माणगाव), प्रिन्सभाऊ शेलार ( सदस्य देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य) या दिग्गजांची उपस्थिती लाभली.
     माणगांव तालुक्यामध्ये देवा ग्रुप फाऊंडेशन व जिवलग मित्र परिवार या दोन्ही ग्रुप चे सदस्य फक्त माणगांवकरांसाठीच नव्हे तर माणगांव तालुक्यातील प्रत्येक गरजू नागरिकासाठी मदतीची तत्परता दाखवत असतात. गरज कोणतीही असो सतत मदतीचा हात ४९१ म्हणजेच देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि जिवलग मित्र परिवार माणगांवचे अध्यक्ष अल्पेशदादा कापडेकर व त्यांचे परममित्र सुशिलकुमार वाटवे यांच्या माध्यामातून होत असतो. अश्याचपैकी एक कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्य वाटप करण्याच्या घेतलेल्या कार्यक्रमामुऴे देवा ग्रुप फाऊंडेशन आणि जिवलग मित्र परिवार यांचे माणगांव शहरच नव्हे तर पूर्ण तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

Popular posts from this blog